देशात १२ तासात २४० करोनाग्रस्त वाढले आहेत, त्यामुळे करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १६३७ वर गेली आहे. तर आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय चिंता वाढवणारी बातमी आहे. दरम्यान १६३७ रुग्णांपैकी १३३ जण बरे झाले आहेत अशीही माहिती मिळते आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. काल रात्रीपर्यंत रुग्णांची संख्या १३९७ होती. मात्र मागील १२ तासात २४० ने ही संख्या वाढली आहे.
देशात काल रात्रीपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या १३९७ होती. जी आता २४० ने वाढली आहे. देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

अधिक वाचा  गडचिरोलीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस