आळंदी (दिनेश कुर्‍हाडे) : महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रूग्णांना रक्ताची गरजमोठ्या प्रमाणात भासत आहे. महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने रक्तदानाचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत आळंदी ग्रामस्थांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. साईराज मंगल कार्यालय याठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात २८५ रक्तदात्यांनी रक्तदान करूण सामाजिक बांधिलकी जपली.
ओम ब्लड बँक,पुणे यांनी रक्त संकलनासाठी सहकार्य केले.यावेळी नगरसेवक सचिन गिलबिले, दिनेश घुले, नगरसेविका शैला तापकीर, अविनाश तापकीर, प्रदीप बवले, गिरिश काटे, पद्माकर तापकीर, दिपक काळे, आशिष तापकीर,संदेश तापकीर, आकाश जोशी,सतीश कुऱ्हाडे,प्रसाद बोराटे,गोविंदा कुऱ्हाडे, सागर रानवडे, सचिन काळे यांनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची अत्यंत सुरक्षितपणे आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करूनच रक्त घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगबाबतही विशेष काळजी घेण्यात आली.. दोन रक्तदात्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवत स्वच्छतेची विशेष खबरदारी घेतली. यासाठी नगरसेवक सचिन गिलबिले यांनी विशेष प्रयत्न केले.
जागतिक आपत्तीत संचारबंदी असतांना रक्तादान शिबिराचे आळंदी शहरातील डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शेतकरी, पत्रकार, महिला व तरुण मंडळनीने स्वागत केले आहे. दिवसभरात टप्याटप्याने सर्वानी रक्तदान केले.
राज्यातील रुग्णांची रक्ताची गरज भागविण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून मोठ्या संख्येने दात्यांनी सहभागी होऊन राष्ट्रसेवेत योगदान दिले आहे असे मत नगरसेवक दिनेश घुले यांनी व्यक्त केले.
रक्तदान शिबिरात एकावेळी चार दात्यांचे रक्त स्विकारले गेले.आळंदी शहरात दुपारी जोरदार पाऊस पडला असताना नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त सहभाग होता. दिवसभरात ज्यांना शक्य झाले नाही असे रक्तदाते २ एप्रिल रोजी होणाऱ्याआळंदी येथील ज्ञानेश्वर महाराज आजोळघर येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करू शकतात. त्यांच्यासाठीच खास पुन्हा शिबीराचे आयोजन करण्यात आले असून रक्तदात्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेविका शैला तापकीर यांनी केले.

अधिक वाचा  सैफवर एकूण 6 वार, पाठीत चाकू खुपसलेल्या अवस्थेत…; मानेवर 10 सेमीची जखम… सैफचा जीव जाईपर्यंत मारलं?