मुंबईः सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्रिपदी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आतापासून आता सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा जितेंद्र आव्हाडांकडे असेल. यासंदर्भात शासन आदेशही तातडीने जारी करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदं वाटून देण्यात आली होती. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

दिलीप वळसे पाटील यांनी पालकमंत्री झाल्यापासून केवळ दोनदा जिल्ह्याचा दौरा केला होता. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे नवा पालकमंत्री नेमण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  अखेर ठरले…साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी

कामगार मंत्री दिलीप वळसे -पाटील हे अभ्यासू आणि जबाबदार राजकिय नेते म्हणून ओळखले जातात. तसंच वळसे पाटील पालकमंत्रिपदाबाबत फार इच्छुक नव्हते. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात सोलापूर जिल्हावासियांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या. जितेंद्र आव्हाड यांना आधी कॅबिनेट मंत्रिपद दिले होते, पण पालकमंत्री पदाची जबाबदारी नव्हती. आता आव्हाडांकडे सोलापूरची जबाबदारी आली आहे.

लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. महापालिका, रुग्णालये, अत्यावश्यक वस्तूची सेवा देणारी दुकाने सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. लॉकडाऊनच्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील गायब आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर पालकमंत्र्यांचे नियंत्रण नाही, अशी टीका विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणात होत होती. सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती

अधिक वाचा  बाबासाहेबांच्या भव्यदिव्य मिरवणुकीवर शिवडी विभागात ठिकठिकाणी फुलांच्या वर्षांवाने स्वागत