मुंबई : राज्यभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. कोरोनाशी (Covid – 19) लढण्यासाठी मुख्यमंत्री (CM) आणि पंतप्रधानांनी (PM) मदतीचं आवाहन केलं आहे. यात आता नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या नाम या फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.
आतापर्यंत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींपासून अगदी सर्वसामान्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला जितकं शक्य आहे तितकी मदत केली आहे. हळूहळू हा मदतीचा ओघ वाढत आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करीत आपण मदत करीत असल्याचे सांगितले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपयांची मदत करीत असल्याचे सांगितले.
या क्षणाला आपण सर्वांनी जात-धर्म विसरुन सरकारला सहकार्य करण्यासाठी पुढे यायला हवं. इतक्या मोठ्या संकटाशी सरकार एकटं लढू शकत नाही. यासाठी सर्वानी एकजूट होण्याची गरज आहे. नाम फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपये पाठविणार आहोत. कृपया घराबाहेर पडू नका. सध्या घराबाहेर न पडण हीच मोठी देशसेवा आहे. याशिवाय कोरोनाशी लढ्यात सहकार्य म्हणून मदत कराल अशी आशा आहे.
आतापर्यंत अनेक उद्योगपती, खेळाडू, अभिनेत्यांनी पंतप्रधानांना मोठी मदत केली आहे. या मदतीतून कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे.

अधिक वाचा  मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच; फक्तं देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय; बावनकुळे कडाडले