मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. अचानक आलेल्या या महामारीमुळे हजारो लोकांचे प्राण गेले आहे. तर संपूर्ण जगात ७ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आजार कशामुळे पसरतो, आजाराची लक्षणं काय आहेत याची कल्पना संपूर्ण जगाला आहे. पण गेल्या काही दिवसात असं काही घडलं आहे ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मृतदेहाच्या संपर्कात आल्यामुळे एका कुटुंबातील १७ जणांना कोरोनाची लागण झाली. सर्वात आधी कुटुंबातील एका स्त्रीला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले होते.
१३ मार्च रोजी आपल्या काकीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेली ६५ वर्षीय वृद्ध महिला आजारी पडली . अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्यानंतर मिडलँड्समधील ६५ वर्षीय वृद्ध महिलेला बर्मिंघॅमच्या क्वीन एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा  विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय…