तंत्रशुद्ध फलंदाज म्हटलं तर सध्याच्या घडीला सर्वांच्याच मुखी चेतेश्वर पुजाराचे नाव आल्यावाचून राहत नाही. कारण कसोटी क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करायला हवी, याचा उत्तम वस्तुपाठ हा पुजारा दाखवत असतो. सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे भारत बंद आहे. त्यामुळे आता पुजारा क्रिकेटच्या मैदानात नाही तर घरकामामध्ये रमलेला पाहायला मिळत आहे. घरात काम करत असल्याचे पुजाराचे फोटो आता चांगलेच वायरल होताना दिसत आहेत.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. काही वेळा ही सभ्यता क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाही. पण आदर्शवत क्रिकेटपटू कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुजारा. कारण आतापर्यंत शांत चित्ताने तो आपली कामगिरी करताना दिसतो. बऱ्याचदा काही खेळाडू त्याची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करतात, पण अजूनपर्यंत तरी तसे पाहायला मिळालेले नाही.
पुजाराकडे चांगली गुणवत्ता आहे, त्याचबरोबर अथक मेहनत घेण्याचीही तयारी आहे. एखादे ध्येय गाठण्यासाठी जी टिकाटी लागते तीदेखील त्याच्याकडे आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात पुजाराने आपल्या नावाचा एक ठसा उमटवला आहे.
सध्याच्या घडीला देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे पुजारा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळताना दिसत नाही. कारण सध्याच्या घडीला पुजारा आपल्या घरीच आहे. पण घरीही तो स्वस्थ बसलेला नाही, तर घरकामात तो आपल्या पत्नीला मदत करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर आपल्या मुलीला खेळवण्याचे कामही तो आनंदाने करत असल्याचे फोटो चांगलेच वायरल झाले आहेत.
काही दिवसांपासून भारतामध्ये करोनाग्रस्तांसाठी खेळाडू पुढे सरसावल्याचे पाहायला मिळत आहेत. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही ५० लाखांची मदत जाहीर केली होती. या मदतीसाठी सर्वात पहिला उतरलेला क्रिकेटपटू म्हणजे भाजपाचा खासदार गौतम गंभीर. करोनाग्रस्तांसाठी गंभीरने पहिल्यांदा ५० लाख रुपयांची मदत केली होती. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही मदतीचा हात पुढे केला होता. भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनानेही ५२ लाखांची मदत जाहीर केली होती. भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचे अध्यक्ष यांनी या संकटकाळात शाळा किंवा धर्मशाळेत अडकलेल्या लोकांसाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान दिले होते.

अधिक वाचा  सभागृहात १०हजार कोटी घोटाळ्यांची चर्चा अन् टेंडरविना ‘HLL’ला 2000 कोटींचं कंत्राट; आरोग्यमंत्र्यांची चलाखी