मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली होती.
‘जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता.’ अस जयंत पाटील त्यावेळी म्हणाले होते. मात्र त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोना बधितांची संख्या वाढल्याने भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी इस्लामपूर येथे कोरोनाची लागण मोदींवर टीका केल्याने झाल्याचा जावई शोध लावला होता.
आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अवधूत वाघ यांच्या याच वाचाळ टीकेचा समाचार जोरदार समाचार घेतला आहे. ‘बेताल पणा व असंवेदशिलतेचा कळस.. कोरोनाच्या धास्तीने बहुतेक परिणाम झालाय..अशा प्रवृत्तीचा निषेध l वाघ की…. ???’ असं ट्विट करत मिटकरी यांनी अवधूत वाघ यांना चानाग्ल्च झापलं आहे.
दरम्यान, अवधूत वाघ यांच्या याच वाचाळ टीकेचा समाचार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून घेतला आहे. इस्लामपूरबाबत जे विधान महाराष्ट्रातील चवचाल भाजपवाल्यांनी केले ते मोदींच्या कानावर गेले तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी. ही पंतप्रधान मोदींची तर बदनामी आहेच, पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या वैचारिक वारशालाही धक्का देणारे हे वर्तन आहे. असा घणाघात सामना मधून केला आहे.