दोन महायुद्धे, १९१८ मधील स्पॅनिश फ्लूची साथ अनुभवलेल्या १०८ वर्षांच्या महिलेचा ब्रिटनमध्ये करोनामुळे मृत्यू झाला आहे. हिल्डा चार्लिस असे या महिलेने नाव असून ५ एप्रिल रोजी ही महिला १०९ वर्षांची झाली असती.
हिल्डा यांच्यामधे मंगळवारी विषाणूची लागण झाल्याची लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांच्यावर सॅल्फर्ड सिटी येथे उपचार सुरु होते. मात्र चार दिवस करोनाला झुंज दिल्यानंतर अखेर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झालेल्या त्या ब्रिटनमधील सर्वात वयस्कर रुग्ण ठरल्या आहेत.
आम्ही अंतिम क्षणांमध्ये आमच्या आजीजवळ राहू शकलो नाही याचे वाईट वाटतं आहे, असं हिल्डा यांचा नातू अँथनी चर्चिल यांनी सांगितलं. आजीचा वाढदिवस अवघ्या एक दीड आठवड्यावर होता. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली त्यात पाच कोटी लोकं मरण पावले होते, त्यावेळी आमच्या आजीचे वज अवघे १२ वर्ष होते, अशी माहिती अँथनी यांनी दिली.

अधिक वाचा  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीतही सुत्रे हल्ली ; खासदाराचा पाठपुरावा मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल