मुंबई- करोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या ‘कोविड १९’नं संपूर्ण जगासोबतच भारतालाही विळखा घातलाय. दिवसेंदिवस हा विळखा घट्ट होताना दिसत आहे. पण सकारात्मक बाब म्हणजे अनेक रुग्ण बरेही होत आहेत. करोनामुळे २१ दिवसांसाठी देश लॉकडाउन झाला आहे. मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीयांना या लॉकडाउनचा फारसा फटका बसला नसला तरी हातावर पोट असणाऱ्यांसाठी मात्र हा कठीण काळ आहे.
अनेकांना दिवसाचं धान्य कुठून आणायचं हा प्रश्नही आहेच. या कठीण काळात अनेक सेलिब्रिटी स्वतःहून मदत करत आहेत. एकीकडे अक्षय कुमारने करोना विरुद्धच्या लढाइत २५ कोटींची मदत केली. तर आता सलमानने तब्बल २५ हजार मजदूरांची जबाबदारी उचलली आहे. याविषयी सलमानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले की, ‘सलमान जी मदत करत आहे त्यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मला याबद्दल फारसं काही माहीत नाही. पण माझ्या कुटुंबाचा एक नियम आहे. आमचा पैसा जिथे जातोय तिथे तो दिसला पाहिजे आणि कोणाच्यातरी कामी आला पाहिजे. आम्ही आमच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी आणि सुरक्षा रक्षकांसाठीही जेवणाची सोय करत आहोत. आपल्या सर्वांनाच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे.’
सलमान खानच्या फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?
सलमानची भावंडं अरबाज खान आणि सोहेल खान यांचं प्रोडक्शन हाऊउसही आहे. सलमान खान फिल्म्स असं या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. रिपोर्टनुसार, मार्च महिन्यात लॉकडाउन झाल्यानंतर स्टूडिओमधील कर्मचाऱ्यांना त्यांनी एक महिन्याचा पगार आधीच दिला. याशिवाय फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने- एम्पॉइजने सांगितलं की, सलमान खानने सिनेसृष्टीतील २५ हजार कर्मचाऱ्यांचा आर्थिक खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. सलमानच्या बीइंग ह्यूमन या एनजीओ मार्फत कर्मचाऱ्यांचा खर्च उचलण्यात येणार आहे. FWICE चे अध्यक्ष बी.ए. तिवारी म्हणाले की, बीइंग ह्युमन मार्फत सलमान आमच्यापर्यंत पोहोचला आणि कामगारांच्या मदतीसाठी धावून आला. याशिवाय FWIC चे जनरल सेक्रेटरी अशोक पंडीत म्हणाले की, ज्यांचं दिवसावर पोट आहे अशांना महिन्याला १५ हजार रुपये दिले जातात. सलमानने २५ हजार लोकांचे अकाउंट डिटेल्स मागितले होते. तो या सर्वांची मदत करू इच्छितो. याशिवाय सलमान त्यांच्या वैद्यकीय सुविधांसाठी महिन्याला ५ लाख रुपये खर्च करणार आहे.

अधिक वाचा  मंत्रिमंडळ विस्तार मोठे फेरबदल पुण्यातही मंत्रिपद काहीचं प्रमोशन खातं बदलही, मराठा नेतृत्वही वाढणार: सूत्र