पुणे : जगभरात कोरोना व्हायरसमुळे थैमान घातले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असं आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. परंतु, एका क्रमांकामुळे तुमचे पैसे चुकीच्या खात्यात जाण्याची शक्यता होती. पण, एका सजग पुणेकरामुळे हा प्रकार वेळीच थांबला.
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लोकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवता यावे म्हणून ‘प्रधानमंत्री सहायता निधी’ जाहीर करण्यात आली. यासोबतच एक यूपीआय क्रमांकही जाहीर करण्यात आला होता. यूपीआय क्रमांक हा कोणतेही पैसे पाठवण्यासाठी सोईस्कर समजला जातो. कुणाच्या खात्यात किंवा काही खरेदी केलं असेल तर यूपीआय मार्फत तुम्हाला सहज पैसे देता येतात. म्हणून हा ‘युपीआय’क्रमांक ही जाहीर केला.
मात्र, पंतप्रधान निधीसाठी जाहीर करण्यात आलेला क्रमांक हा आधीच अस्तित्वात असलेल्या एका क्रमांकाशी मिळता जुळता होता.पुण्यातील पाषाण परिसरात पंचवटी इथं राहणारे चंद्रशेखर शिसोदे यांच्या लक्षात ही बाब आणि त्यांनी तातडीने ट्वीट करून पंतप्रधान कार्यालय आणि एसबीआय बँकेला याबद्दल माहिती दिली.
पंतप्रधान सहायता निधीसाठी pmcares@sbi असा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तर याच क्रमांकाशी मिळता जुळता pmcare@sbi हा यूपीआय क्रमांक होता. या दोन्ही क्रमांकामध्ये फक्त S या अक्षराचा फरक आहे. पंतप्रधान सहायता निधीच्या क्रमांकामध्ये (pmcares@sbi) S आहे . तर दुसऱ्या क्रमांकामध्ये
(pmcare@sbi) S नाहीये. त्यामुळे जर चुकून एखादा शब्द गहाळ झाला तर तुमचे लाखो रुपये हे इतर दुसऱ्या खात्यात जाण्याची दाट शक्यता होती.
परंतु, चंद्रशेखर शिसोदे यांनी ही बाब उघड केल्यामुळे एसबीआयने हा क्रमांक खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच एसबीआयने हा क्रमांक हटवला सुद्धा आहे. एसबीआयने तातडीने पाऊल उचलल्यामुळे पुढील घोटाळा टळला आहे.

अधिक वाचा  संविधान बदलण्याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट उत्तर