कोरोना व्हायरसमुळे 2020 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 2021मध्ये ही स्पर्धा कधी होईल, याबाबतची घोषणा सोमवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ( आयओसी), आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती ( आयपीसी), टोक्यो आयोजन समिती आणि टोक्यो सरकारची बैठक झाली. त्यात ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत घेण्याचा निर्णय झाला, तर पॅरालिम्पिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत होईल.
आयओसीनं म्हटलं की,”आरोग्य विभागानं आम्हाला या तारखा दिल्या आहेत. कोरोना व्हायरसमुळे यंदाची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.” आयओसी अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले की,”आपण या आव्हानावर मात करू असा मला विश्वास आहे.”

अधिक वाचा  अमोल मिटकरींचा शिंदे गटाच्या रामदास कदमांवर पलटवार ; अजितदादा वेळेत आले म्हणून…