ठाकरे सरकारने ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांसाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. यामध्ये स्थलांतरिक कामगार, बेघर लोक राहू शकतात. त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेतच स्थलांतरित मजुरांना स्थलांतर करु नका. तुम्ही आहेत तिथेच थांबा तुमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करु असं आश्वासन दिलं होतं. ज्यानंत काही वेळात ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाइव्हद्वारे महाराष्ट्राशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा आपल्या घरीच थांबा असं आवाहन सगळ्या जनतेला केली. तसेच जे पायी जाउन राज्य सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना राज्य न सोडण्याचीही विनंती करण्यात आली आहे. हे आश्वासन दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच महाराष्ट्रात २६२ केंद्रं उभी राहिल्याची माहिती दिली.

अधिक वाचा  लाडक्या बहिणींना पुन्हा लॉटरी, नोव्हेंबरचे पैसे अॅडव्हान्समध्ये मिळणार, 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3 हजार जमा होणार!