मुंबई: करोनामुळं संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नागरिकांना घरात थांबवून ठेवण्याचं आवाहन प्रशासणासमोर आहे. यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दुरदर्शन वाहिनीवर ‘रामायण’ मालिका पुन्हा दाखवण्यात येईल अशी माहिती दिली. आज या मालिकेचा पहिला भाग सकाळी ९ वाजता दाखवण्यात आला. यानंतर त्यांना एक ट्विट केलं होतं. पण बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान हिनं या ट्विटरवर टीका केल्यानंतर जावडेकर यांनी हे ट्विट डिलिट केलं आहे.
जावडेकर यांनी एक फोटो ट्विट केला होता. त्यात जावडेकर सोफ्यावर बसून रामायण मालिका पाहात असल्याचं दिसत होतं. ‘मी ‘रामायण’ पाहतोय…तुम्ही??’, असं कॅप्शन जावडेकर यांनी त्यांच्या फोटोला दिला होता. जावडेकर यांचं हे ट्विट पाहून फराह खाननं संताप व्यक्त केला. फराह खाननं जावडेकरांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘मला तुम्ही घरी आरामात टीव्ही पाहाताना दिसतायत. परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी जाण्यासाठी अन्न-पाण्याशिवाय कैक किलो मीटर पायपीट करत आहेत’, असं ट्विट जावडेकरांनी केलं आहे.फराह खानसोबतच इतर ट्विटर युजर्सनी जावडेकरांनी त्यांचं हे ट्विट डिलिट केलं आहे.
दरम्यान, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनें देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. लॉकडाऊनचा आजचा चौथा दिवस आहे. पण या लॉकडाऊनमुळे हाल सुरू झाल्याने परप्रांतीय मजूर आहे त्या स्थितीत आपापल्या राज्यांकडे निघाले आहेत. त्यांचे जत्थेच्या जत्थे शहरांकडून गावांकडे निघाले आहेत. शेकडो किलोमीटर दूर असलेल्या गावांकडे ते पायीच निघाले आहेत.

अधिक वाचा  राज्यात आगामी काळात धक्कादायक घडामोडी? मोदींचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री शिंदे अन् आठवलेंना कॅबिनेटपद नाही