नवी दिल्ली : भारतात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आत्तापर्यंत ९१८ वर पोहचलीय. यामध्ये, परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. तर दिलासादायक म्हणजे आत्तापर्यंत ८० रुग्णांवर यशस्वी उपचार झालेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. भारत सरकारकडून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी हरएक पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक कठोर पावलं उचलण्यात आली आहे. अशा जागतिक संकटात परदेशांत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

प्रमुख राज्य

केरळ १६८

राजस्थान ५२

तेलंगणा ४६

उत्तर प्रदेश ५४

तामिळनाडू ३४

पंजाब ३८

कर्नाटक ५५

महाराष्ट्र १८६

अधिक वाचा  पेपर लीक प्रकरण ‘सर्वोच्च’मध्ये 38 याचिका! तर नीट यूजी परीक्षाच रद्द होणार, न्यायालयाचा सुनावणीत इशारा

गुजरात ४४

मध्य प्रदेश ३४

एकुण८६६

करोनाशी संबंधीत कोणतीही माहिती मिळवण्यासाठी +९१-११-२३९७८०४६ या क्रमांकावर फोन करा. याशिवाय राज्यांनीही आपले हेल्पलाईन क्रमांक जारी केलेले आहेत.
महाराष्ट्रातील नागरिकांनी करोना व्हायरसशी संबंधित अधिकृत माहिती मिळवण्यासाठी पुढील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
राज्य नियंत्रण कक्ष : ०२० – २६१२७३९४
टोल फ्री नंबर : १०४
राष्ट्रीय कॉल सेंटर : +९१ ११ २३९७८०४६
करोनाशी लढण्यासाठी टाटांकडून १५०० कोटी