मुंबई : ‘दर्या, नभामधून, सप्त सागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला…. ‘ हा आवाज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या कानावर पडणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. त्यामुळे सर्व मालिकांच्या शूटींग देखील रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता जुन्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’. या मालिके अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात आहे.
येत्या ३० मार्च पासून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दुपारी ४ वाजता मालिका प्रसारित होईल. ४ ते ८ या वेळेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  त्याचप्रमाणे, रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोना पासून मुक्ती मिळवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहेत. शिवाय दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येकाने जबाबदारीने आणि स्वयंशिस्तीने वागत आपल्या वाट्याला आलेलं हे आव्हान परतवून लावण्यामध्या हातभार लावणं अपेक्षित आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात राजकारणाच्या सगळ्या चौकटी डोळ्यांदेखत उध्वस्त; आता फक्तं ‘निकाल’ लागावा अन् कौल कळावा