सांगली – सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशात जाऊन आलेल्या डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरू ठेवून प्रॅक्टिस केली आहे. मिरजमधील श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटलवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. सांगली महापालिकेने मिरजेतील श्रीनिवास हॉस्पिटल आणि सोमशेखर हॉस्पिटलवर छापा घालून हे दोन्ही दवाखाने सील केले आहेत. डॉ. जी.ए.श्रीनिवास आणि डॉ. सोमशेखर याना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
वास्तविक पाहता या डॉक्टरांनी परदेशातून आल्यानंतर प्रशासनाला सांगणे गरजेचे होते, आणि त्याहून ही धक्कादायक बाब म्हणजे, दवाखाना सुरू ठेवून अन्य रुग्णाच्या आरोग्य बरोबर एकप्रकारे धोकाच त्यांनी केला. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे.

अधिक वाचा  संघाच्या हिंदुत्ववादी भूमिकेलाच आव्हान व्यापारी जोडीचा डाव: भाजपचे वस्त्रहरणही याच दुर्योधनांनी केले: शिवसेना