मुंबई-पुण्यावरुन जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना सक्तीने संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करु नका. जेथे आहात तेथेच घरी सुरक्षित रहा, असे आवाहन वजा कडक इशारााच पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे. दुधाचे टँकर,रुग्णवाहिका व इतर जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून व्यक्तींची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी बेकायदेशीर व धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही सतेज पाटील यांनी त्यांनी यावेळी दिला आहे.
सव्वा कोटीचे व्हेंटीलेटर
जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सव्वा कोटी रुपयांचे व्हेटीलेटर्स विकत घेतले आहेत. मास्क, ग्लोव्हज आवश्यक त्या सर्व सुविधा कमी पडणार नाहीत यासाठी प्रयत्न सुरु आहेेत. जिल्ह्यात कोरोनासाठी शंभर खाटांची सुविधा असावी असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार सीपीआरमध्येच हे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.इचलकरंजी येथील निरामय, अलायन्स हे हॉस्पिटल अधिग्रहीत केली आहेत. गडहिंग्लज मधील केदारी रेडेकर हॉस्पिटल स्वत:हून प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. पारगावचे वारणा हॉस्पिटलनेही परवानगीचे पत्र दिले आहे. दुर्देवाने वेळ आलीच तर सगळ्या दृष्टीने तयारी असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. लोकांनी संयम पाळावा.प्रशासनामार्फत योग्य ती उपाय योजना करण्यात येत आहे.एक रुग्ण सापडल्यावर 100 लोकांना होम क्वॉरंटाईन आणि पाचशे मीटरचा परिसर सीमाबंद करण्याची वेळ आली आहे.याचा विचार नागरिकांनी करावा.

अधिक वाचा  महाराष्ट्राला वेध विधानसभा निवडणुकीचे! निवडणूक आयोगाची तयारीची तारीख जाहीर

ज्यांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी घरातून बाहेर पडू नये. लक्षणे असतील तर त्वरित प्रशासनाला संपर्क करावा. तर आजपर्यंत 600 मोटर सायकली जप्त करण्यात आल्या असून, गरज नसेल तर घरातून बाहेर पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले. दूध उत्पादक संस्थांनी दूध न नाकारता त्याचे संकलन करावे.अतिरिक्त दुधाची भुकटी करता येईल का याबाबत केंद्राशी बोलून राज्य शासन प्रयत्न करीत आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शिवभोजन थाळीच्या चांगल्या निर्णयाचा 500 हुन अधिक सामान्य नागरिकांना आज फायदा झाला आहे. शेतकऱ्यांसाठी दिवसाचा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यस्तरावरुन आपला प्रयत्न सुरु असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा  विधानसभेपूर्वीच राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचले ; हिंमत असेल तर…

वस्तुनिष्ठ माहितीसाठी वर्तमानपत्रे घ्या
उद्यापासून जिल्ह्यात वर्तमानपत्रे सुरु करण्याचा निर्णय काही संपादकांनी घेतलेला आहे. वृत्तपत्रामुळे संसर्ग होत नाही.वस्तुनिष्ठ माहिती समजण्यासाठी वाचकांनी न घाबरता वर्तमानपत्रे घ्यावीत. यासाठी वर्तमानपत्रे वितरण करणाऱ्यास मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझर द्यावे. कोणती ही तक्रार येवू नये याची दक्षता संबंधित संपादकांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.