बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुठल्याश्या कारणामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या चर्चांमुळे आलिया आता चांगलीच हैराण झाली आहे. अखेर तिने याबाबत आता आपले मौन सोडले आहे.
आलियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आलिया तिच्या बाल्कनीमध्ये उभी राहून सूर्यास्ताकडे पाहात आहे. मात्र तिच्या या फोटोपेक्षा फोटोला दिलेल्या कॅप्शननेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “घरी रहा आणि सूर्यास्त पहा” असं तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. इतकंच नाही तर या फोटोचं श्रेय देताना तिने, “माझा ऑल टाईम फेव्हरेट फोटोग्राफर आर.के” असं म्हटलं आहे. या कॅप्शनमुळे हा फोटो रणबीर कपूरने क्लिक केल्याचं म्हटलं जात आहे.
आलियाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी तर रणबीर कपूरच्या फोटोग्राफीची स्तुती देखील केली आहे.

अधिक वाचा  पुणे ‘हिट अँड रन’ केस आरोपींना वाचविण्याचा कारनामा सुरुच; माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक अन् गंभीर आरोप