सध्या देशात करोना व्हायरसचे सावट पाहायला मिळते. तसेच करोना व्हायरसला झूंज देण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला आहे. भारतात जवळपास २०० हून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. अनेक बॉलिवूड कलाकार जनजागृतीचा संदेश सोशल मीडियाद्वारे देत आहेत. अशात अभिनेत्री नगमाचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने या ट्विटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौरा केला होता. तेव्हाची आठवण करुन देत नगमाने मोदींवर निशाणा साधला आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी १२० कोटी रुपयांचा खर्च केला आणि करोना व्हायरससाठी केवळ टाळ्या आणि थाली अशा आशयाचे ट्विट नगमाने केले आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या ट्विटवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे.
देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना मुंबई, पुणे आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मोनरंजन श्रेत्रातील कलाकारांनीही या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसत आहे.

अधिक वाचा  शरद पवारांच्या नावावरच निवडणूक लढवणार, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचे खंडन