इंदोर : भारतातील (India) सर्वात स्वच्छ शहर इंदोर (Indore) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) लढाईतही अव्वल आहे. शहरात कोरोनाव्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी ड्रोनमार्फत (drone) संपूर्ण शहर सॅनिटाइझ (sanitize) केलं जातं आहे.
मध्य प्रदेशच्या जबलरपूरमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं समोर आल्यानंतर इंदूर शहरात खबरदारी म्हणून ड्रोनमार्फत व्हायरसनाशक केमिकलची फवारणी केली जाते आहे.
कोरोनाव्हायरसचा प्रसार होऊ नये, यासाठी ड्रोनमार्फत व्हायरसनाशकाची फवारणी करणारं इंदोर हे देशातील पहिलं शहर आहे.
इंदूर महानगरपालिकेचे आयुक्त आशिष सिंह यांनी सांगितलं की, “चीनमध्ये असा प्रयोग करण्यात आला आहे त्यानंतर देशातील गर्दीच्या ठिकाणांना ड्रोनमार्फत सॅनिटाइझ करण्याचा हा पहिला प्रयोग असावा. ड्रोनमार्फत शहरातील प्रमुख बाजार, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणांवर सोडियम हायपो क्लोराइड आणि बायो क्लीनची फवारणी केली जाते आहे”
महापालिकेने एका कंपनीकडून 2 ड्रोन भाडेतत्वावर घेतलेत. यामध्ये 16 लीटर केमिकल साठवण्याची आणि 30 मिनिटांपर्यंत फवारणी करण्याची क्षमता आहे. एका वेळी 8 ते 10 किलोमीटर क्षेत्रात फवारणी केली जाते आहे.
ड्रोनमार्फत फवारणी करण्यात येणारं औषध कुणालाही हानीकारक ठरणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. यासाठी हे औषध हर्बल पद्धतीने बनवण्यात आलं आहे.

अधिक वाचा  विरोधकांच्या हाती ‘कोलीत’?; अंबानींचे जावई आनंद पिरामल RSSच्या कार्यकर्ता ‘विकास वर्गा’च्या कार्यक्रमात