करोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांना देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. याच मोहिमेत आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही साथ दिली आहे. त्यांनी टि्वट करून जनतेला आवाहन केले आहे
शरद पवार यांनी टि्वट केले की, “कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू अर्थात घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे ही विनंती.”

अधिक वाचा  ‘इंडिया नव्हे, भारत बोला’चे आग्रही जैन ऋषी आचार्य विद्यासागर समाधीस्थ: मौन अन् चंद्रगिरीतीर्थ देहत्याग