पुण्यात आणखी एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. दीपक म्हैसेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती त्यांनी दिली. या रुग्णाला तातडीने नायडू रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच जे होम क्वारंटाईन करण्यात आलेले रुग्ण आहेत त्यांनी घराबाहेर पडू नये असंही आवाहन आज म्हैसेकर यांनी पुन्हा एकदा केलं.
होम क्वारंटाईन केलेले लोक गुन्हेगार नाहीत. त्यांना दुसऱ्या कुणामुळे तरी करोनाची लागण झालेली असू शकते. आज आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. त्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे अशीही माहिती म्हैसेकर यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून एसटीच्याही ८० टक्के फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत असंही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  एनडीएची देणार कायम साथ की येणार शरद पवारांच्या गटात? अजितदादांसमोर पर्याय तरी काय?