देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना मुंबई, पुणे आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मोनरंजन श्रेत्रातील कलाकारांनीही या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसत आहे. अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा यांनाही ट्विटवरुन एक टिकटॉक व्हिडिओ पोस्ट करत घरातच राहण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे.
रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये जनता कर्फ्यू, भारत करोनाशी लढा देत आहे असं नमूद केलं आहे. या व्हिडिओमध्ये रितेशने “घरीच थांबा, ठणठणीत राहा,” असा संदेश दिला आहे. तर जेनेलियाने, “भारत करोनाशी लढा देत आहे,” असं म्हटलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी दोघेही चेहऱ्यावर मास्क घालून नमस्कार करत आपल्या चाहत्यांना घरीच राहण्याची विनंती करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटची राष्ट्रगिताची धून ऐकू येते. यामधून भारतासाठी हे इतकं करा असं सांगण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे.

अधिक वाचा  होऊ दे खर्च! यंदा लोकसभा निवडणुकीत तब्बल ‘इतके’ लाख कोटी खर्च होऊ शकतात