देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यापासून ते रविवारी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही मोदींनी केलं. याचसोबत रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराबाहेर येऊन अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी टाळ्या वाजवत कौतुक करण्याचं आवाहनही मोदींनी केलं.
याच विनंतीवरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. करोनामुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजदूर यांना फटका बसला आहे. टाळ्या वाजवून यांना मदत मिळणार नसल्याचं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत, रेल्वे प्रशासनानेही रविवारी महत्वाच्या गाड्या रद्द केल्या आहेत. अधिकाधिक लोकांनी घरात रहावं यासाठी मुंबई मेट्रोनेही रविवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातही करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकार मुंबई लोकल शट डाऊन करण्याचा विचार करत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  बहिणींची अब्रु वाचण्याच्या शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, 100 टक्के….