अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वेगानं वाढत असल्यानं केंद्राबरोबर राज्यातील सरकारांकडून लोकांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधताना आज (२२ मार्च) जनता संचारबंदी (जनता कर्फ्यू) पाळण्याचं आवाहन केलं होतं. या कर्फ्यूला पहाटे सुरूवात झाली असून मोदी यांनी पुन्हा एकदा या सहभागी होण्याचं आवाहन ट्विटरवरून केलं आहे.

अधिक वाचा  फडणवीसांच्या राजकिय एंट्रीनंतरच सध्याचे राजकारण गढूळ: शरद पवार गटाचे नेते आमदार