पुणे : कोरोना रोखण्यासाठी शासनाने अत्यंत कडक पाऊले उचलली आहेत. बलिदान भुमी तुळापुर व वढु बुद्रुक मधील होणारे सर्व कार्यक्रम ग्रामस्थांनी थांबविले आहेत. शासनाने पालखी सोहळा रद्द करावा अशी विनंती केली आहे , त्यामुळे शासनाच्या विनंतीला मान देत आणि शिव – शंभू प्रेमीं आणि नागरिकांच्या आरोग्यास प्रादुर्भाव होऊ नये म्हणून यावर्षीचा छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा रद्द करण्यात येत आहे अशी माहिती अध्यक्ष संदीप भोंडवे आणि विश्वस्त महेश टेळेपाटील यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,आपणास कळविताना अत्यंत दुख: होत आहे की, या वर्षी होणारा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा कार्यक्रम पालखी सोहळा समितीच्या वतीने रद्द करण्यात येत आहे.पुढील वर्षी मोठ्या जोमाने आणि जोषात सर्वांनी एकत्र येत पालखी सोहळा साजरा केला जाईल.
कोरोनाचा वाढता प्रभाव पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 22 मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळ किल्ले पुरंदर या ठिकाणाहून सकाळी सात वाजता पालखी तुळापूरच्या च्या दिशेने प्रस्थान करून 24 मार्च रोजी दुपारी अकरा वाजता छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी पोहोचणार होती. पालखीच्या तीन दिवसाच्या या संपूर्ण प्रवासात घेण्यात आलेले वडकी मुकामी होणारा शिवव्याख्याते शेखर पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम, मांजरी याठिकाणी होणार भव्य भजनी स्पर्धा आणि वाघोली याठिकाणी होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा अनेक वर्षे संभाजी महाराजांचा खऱ्या जीवनचरित्राचा प्रचार-प्रसार करत आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी पालखी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना साथ देणारे मावळे व सरदारांचे वंशज यावर्षी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यामध्ये आपल्या ध्वजासह सहभागी होणार होते. परंतु, करोना या संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. पालखी सोहळ्यामध्ये होणारी मोठी गर्दी टाळण्यासाठी यावर्षीची संभाजी महाराजांची पालखी रद्द करण्यात आला आहे. यावेळी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा; सतत वाढत्या तापमानामुळे राज ठाकरेंची सरकारला विनंती