आळंदी देवाची :कोरोनाने महाराष्ट्रातील पुण्यातही शिरकाव केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आदी ठिकाणी कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकाला लागून असणारे आळंदी शहर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. आळंदी विकास युवा मंच यांच्या वतीने आळंदी नगरपालिका प्रशासनाला संदीप नाईकरे पाटील, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, प्रसाद बोराटे, योगिराज सातपुते आदींनी निवेदन दिले.

निवेदनात आळंदी ग्रामीण रुग्णालयातील प्रशासनाने दक्ष आणि अलर्ट राहणे, आळंदी शहरातील मेडिकल आणि दुकानात मास्क आणि सॅनीटायजर जास्त दरात विक्री केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बनावट मास्क आणि सॅनीटायजर विकले जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच शहरातील विविध चौका – चौकात असणार्‍या पान टपऱ्या बंद कराव्यात यावेत. परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. आळंदी शहरातील हद्दीत विविध छोटी मोठी मंगल कार्यालयात लग्न, मुंज, वाढदिवस, विविध कार्यक्रम बंद करण्यात यावे. शहरातील वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था असून त्यांनी सुद्धा दक्षता घ्यावी. तसेच नगरपरिषद स्वछता कर्मचारी यांना मास्क लावूनच काम करावे. आळंदी शहरातील सर्व प्रभागात स्वच्छता मोहीम वेळोवेळी करावी. कोरोना संदर्भात जनजागृती करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आदी मागणी करण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  विधानसभेलाही जरांगे फॅक्टरचा फटका? जरांगेंचा दौरा; मराठवाड्यासह 127 जागांची तयारी शांतता रॅली काढणार