अहमदनगर: शाळेला सुट्टी लागल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना जसा होमवर्क देतात, तशी कामाची यादी शिक्षण विभागाने शिक्षकांना दिली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तरीही शिक्षकांनी कामावर यावे आणि यादीतल कामे उरकावीत, असा आदेश देण्यात आला आहे. शासनाच्या आदेशानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षकांनी काय कामकाज करायचे आहे याची यादी शिक्षण विभागाने दिली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे…
> शिक्षकानी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील याची दक्षता घ्यावी.
> पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करणे, प्रश्नसंच तयार करणे, मूल्यमापन नोंदवही तयार करणे.

अधिक वाचा  इटलीत पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या गांधींच्या पुतळ्याची विठबंना; G7 शिखर परिषद सुरक्षा वाढली

> एप्रिलमध्ये होणाऱ्या संकलित मूल्यमापन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करणे

> शाळांचा यु-डायस डाटा तपासून योग्य असल्याची खात्री करणे.

> शाळेतील प्रशासकीय कामकाज पूर्ण करणे, शालेय पोषण आहार योजनेतील कडधान्ये खराब होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करणे. धान्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करणे.

> ज्या ठिकाणी समग्र शिक्षा अभियान किंवा अन्य योजनांतून बांधकामे सुरू आहेत त्या ठिकाणी बांधकामे वेळेत पूर्ण होतील याबाबत कार्यवाही करावी.

> सरल प्रणालीत माहिती अपडेट करावी तसेच विद्यार्थ्यांच्या आधार कार्डनुसार माहिती अपडेट करावी.