मुंबई: मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईतील ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याचे त्याच्या या दोन्ही कुटुंबीयांना सांगण्यात आले. दोघांनीही विलगीकरण कक्षामध्येच त्याचे अंतिम दर्शन घेतले. संसर्ग पसरू नये, यासाठी मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृतदेह विशिष्ट वैद्यकीय आवरणाने झाकण्यात आला. संसर्ग पसरू नये, यासाठी डॉक्टरांनाही आवश्यक ती सर्व काळजी घेण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले होते. द्यावी लागणार निःशुल्क सेवा खासगी रुग्णालयांमध्येही करोना संशयित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासंदर्भात पालिकेने चर्चा केली आहे. मात्र या रुग्णालयांनी ही सुविध मोफत द्यावी, असे पालिका प्रशासनाने सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाबाबत निर्धारित केलेल्या श्रेणीनुसार ब गटातील, म्हणजेच संशयित गटातील अधिक रुग्ण आखाती देश तसेच युरोपामधून येण्याची शक्यता आहे. विलगीकरणासाठी पालिकेची तयारी आहे. यासाठी विमानतळ प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. विमानांच्या वेळानुसार हे नियोजन करण्यात आले आहे. बोर्डिंग करताना तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही प्रवासीसंख्या कमी असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पालकमंत्रिपदाचे वाटप धनंजय मुंडेंमुळे रखडले का? शिंदे गटातील नेत्याची ‘ही’ माहिती; आम्ही मात्र निवडणुका अश्या लढायचं ठरवलेलंय