देशात आणि जगभरात करोना व्हायरसमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव संपर्कामुळे होत असल्याने श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाने देखील दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांना १७ मार्च ते २३ मार्च या दरम्यान दर्शन बंद करण्यात आले आहे.

करोनामुळे देशभरात सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. तसे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. करोना रोगाला बचाव हाच पर्याय असल्याने देवदर्शन, सप्ताह, लग्न व अन्य स्वरुपाच्या कार्यक्रमांमुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी शहरात जमावबंदी आदेशही दिला आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानाने हा निर्णय घेतला आहे, असे संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे व विश्वस्त मंडळाने कळविले आहे.

अधिक वाचा  ना आलिशान फ्लॅट अन् बंगला; काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट?

दरम्यान, मंदिरातील नित्य पूजा नेहमीप्रमाणे होईल, मात्र दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. पुढील निर्णय २३ मार्च नंतरची परिस्थिती पाहून घेतला जाईल, असे सांगण्यात आले.