मुंबई- बॉलिवूडमधील सुपरहिट अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टचं नाव नक्की घेतलं जातं. २०१२ मध्ये स्टूडन्ट ऑफ दी इअर या सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या आलियाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, बॉलिवूडमधील टॉप १० श्रीमंतांपैकी आलिया एक आहे. फक्त सिनेमांमधून नाही तर अन्य अनेक माध्यमांमधून ती पैसे कमावते. यामुळेच ती आज कोट्यवधीच्या संपत्तीची मालक आहे.

१५ मार्चला आलियाचा जन्म झाला. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊन तिची एकूण मालमत्ता. गेल्या वर्षी फोर्ब्स इंडियाची टॉप १०० सेलिब्रिटींची यादी जाहीर झाली होती. २०१९ च्या या टॉप १०० लिस्टमध्ये आलिया आठव्या स्थानावर होती. तर अभिनेत्रींमध्ये ती अग्रणी आहे. गेल्या वर्षी आलियाने ५९.२१ कोटींची कमाई क्ली आणि २०१८ मध्ये ५८.८३ कोटी रुपये कमावले होते.
तिच्या या कमाईचा मूळ स्त्रोत सिनेमे आहे. २०१९ मध्ये आलियाचे कलंक आणि गली बॉय हे दोन सिनेमे प्रसिद्ध झाले होते. कलंक बॉक्स ऑफिसवर आपटला होता तर गली बॉयने कोट्यवधींची कमाई केली होती. आलिया तिच्या प्रत्येक सिनेमासाठी भली मोठी रक्कम घेते. सिनेमांशिवाय आलियाचं स्वतःचं यूट्यूब चॅनलही आहे. या चॅनलवर १३.३ लाख सबस्क्रायबर आहेत.
तिच्या प्रत्येक व्हिडिओला ३० ते ५० लाख व्ह्यूज मिळतात. साहजिकच यूट्यूब चॅनलकडूनही तिची चांगली कमाई होत असेल. या चॅनलवर आलिया फिटनेस, किचनशी निगडीत व्हिडिओ शेअर करत असते. याशिवाय आलियाने अनेक स्टार्टअपमध्येही गुंतवणूक केली आहे. नुकतेच तिने फॅशन टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. तसेच अनेक ब्रँडसाठी ती जाहिरातीही करते.
यात लेझ, फ्रूटी, उबर ईट्स, फ्लिपकार्ट अशा बड्या ब्रँड्सचा समावेश आहे. या ब्रँड्समुळे आलियाच्या कमाईत तुफान वाढ झाली. एवढंच नाही तर सोशल मीडियावरील पोस्टमधूनही ती चांगली कमाई करते.
नुकतीच सोशल मीडिया मॅनेजमेन्ट कंपनी हॉपर्स HQ ने इन्स्टाग्राम रिच लिस्ट २०१९ जारी केली. यातून बॉलिवूड स्टार त्यांच्या एका पोस्टसाठी किती लाख रुपये घेतात ते कळतं. आलिया तिच्या प्रत्येक पोस्टसाठी जवळपास १ कोटी रुपये घेते. आलियाने हायवे, टू स्टेट्स, हंप्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब , डिअर जिंदगी आणि राजी सिनेमांत काम केलं आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्रात नव्या राजकीय पक्षाचा उदय, नोंदणी झाली, चिन्हं ठरलं; घामटा कुणाला फोडणार?