करोनाने सध्या जगभरात थैमान घातले आहे. मात्र, या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. जोखमीच्या गटातील व्यक्ती जसे की ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण, गरोदर महिला, मूत्रपिंडाचे विकार असणारे, कर्करुग्ण, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा रुग्णांमध्ये करोनाचे स्वरूप गंभीर होण्याचा संभव असतो.

लक्षणे : सर्दी, घसा तीव्रपणे दुखणे, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, उलटय़ा व जुलाब

संसर्ग दोन प्रकारे

* रुग्ण खोकल्यावर हवेत उडालेल्या तुषारांमध्ये विषाणू असतात. ही विषाणूयुक्त हवा श्वसनावाटे शरीरात गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला बाधा होते.

अधिक वाचा  वंदे भारतवर दगडफेक का केली? तरुणाने केले धक्कादायक खुलासे ‘ट्रेनचा वेग कमी होताच…’

* रुग्णाच्या खोकल्यातून उडालेले तुषार विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्यांना हाताचा स्पर्श झाल्यास ते विषाणू हातांना चिकटतात. हे हात चेहऱ्याला लावल्यास श्वसनमार्गातून संसर्ग होतो.

हे करा..

* खोकला, किंवा शिंक आल्यास रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. हे जवळ उपलब्ध नसल्यास कोपर तोंडासमोर धरून शिंका.

* सर्दी, खोकला किंवा ताप याचा संसर्ग झाल्यास मास्कचा वापर करावा, जेणेकरून संसर्ग तुमच्या जवळच्या व्यक्तीला होणार नाही. शक्यतो घरातच आराम करा. संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

* संसर्ग टाळण्यासाठी वरचेवर हात स्वच्छ धुवा. सॅनिटायजर उपलब्ध नसल्यास साबणाने स्वच्छ हात धुतले तरी पुरेसे आहे.

अधिक वाचा  टीम इंडियाचा बांगलादेशला व्हाईटवॉश, दुसऱ्या कसोटीत 7 विकेटने नमवलं

* सर्दी, खोकल्याचा संसर्ग झालेल्या रुग्णापासून एक हात दूर राहा.

* समाजमाध्यमांवरील संदेशांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आरोग्य विभागाकडून अधिकृतपणे जाहीर केलेली माहिती जाणून तिचा प्रसार करा.

हे करू नये..

* लसूण किंवा अन्य कोणताही पदार्थ किंवा औषधे खाल्ल्याने करोनाचा संसर्ग रोखणे शक्य नाही. यासाठी प्रतिबंधात्मक औषधे सध्या तरी उपलब्ध नाहीत.

* सर्दी, खोकला किंवा अन्य संसर्ग न झाल्यास मास्कचा वापर करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांच्याद्वारे इतरांना पसरू नये, म्हणून संसर्गबाधितांनी मास्क वापरणे आवश्यक आहे.

* संसर्ग रोखण्यासाठी म्हणून वरचेवर हात धुणे आवश्यक असले तरी याचा अतिरेक करू नये. तसेच अल्कोहोल किंवा क्लोराईनचा स्प्रे अंगावर मारू नये.

अधिक वाचा  सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच बसायचं का?; अजितदादांचा शरद पवारांवर पुन्हा हल्लाबोल

* कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाऊ नये. भाज्या फळे धुतल्याशिवाय खाऊ नयेत.

* खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर हात धरू नका. हे हात चेहऱ्याला लावल्यास संसर्गाचा धोका असतो

* हात स्वच्छ धुतल्याशिवाय चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे.