गुलाबजाम म्हटलं की कुणाही भारतीय माणसाच्या तोंडाला पाणी सुटतं. गुलाबजाम ही भारतातील सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणून ओळखली जाते. ही मिठाई खाण्यास जितकी मजेदार वाटते, तितकीच तयार करण्यास कठीण असते. ‘गुलाब जाबून’ बनवणे ही एक कला आहे, असेही काही जण म्हणतात. मात्र आता ही मिठाई तयार करण्याचे आव्हान अभिनेत्री ख्रिस टायगेन हिने स्विकारले आहे.
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री ख्रिस टायगेन हिला गुलाबजाम फार आवडतात. अलिकडेच तिला एका चाहत्याने गुलाबजामून तयार करण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान ख्रिसने स्विकारले आहे. “उद्या मी माझ्या आयुष्यातील पहिला गुलाबजाम तयार करणार आहे. मी खूप उत्सुक आहे. त्यासाठी कृपया मला टिप्स द्या.” असे ट्विट करुन ख्रिसने गुलाबजाम तयार करण्याची घोषणा केली आहे.
तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. दरम्यान तिला भारतीय नेटकऱ्यांनी गुलाबजामून तयार करण्यासाठी टिप्स देण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  आपत्ती व्यवस्थापन सक्रिय करा नवीन आलेल्या निष्क्रीय अधिकाऱ्यांना परत पाठवा; भाजपची आयुक्तांकडे मागणी