भोपाळः काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचे १९ समर्थक आमदार बेंगळुरूहून भोपाळसाठी रवाना झाले आहेत. यात कमलनाथ सरकारमधील ६ मंत्र्यांचा समावेश आहे. हे मंत्री परतण्यापूर्वीच राज्यपाल लालजी टंडन यांनी त्यांना मंत्रिपदावरून हटवलंय. मुख्यमंत्री कमलनाथ यांनीच यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. ‘गेलं गेलं गेलं, कमलनाथ सरकार गेलं’ असं नारे भोपाळला रवाना होण्यापूर्वी शिंदे समर्थक आमदारांनी दिले.
विश्वासदर्शक ठरावापूर्वी बंडखोर आमदारांना बेंगळुरूहून परत बोलावण्याची मागणी कमलनाथ सरकारने केली होती. हे आमदार शुक्रवारी पोहोचण्यापूर्वी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांची भेट घेतली. बंडखोर आमदार भोपाळमध्ये पोहोचण्यापूर्वी विमानतळाच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. यावेळी काँग्रेस आणि भाजप समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होते. यामुळे प्रशासनाने विमानतळ परिसारत जमावबंदी लागू केली होती. भाजपने ज्योतिरादित्य शिंदेंना राज्यसभेची उमेदवारी दिलीय. हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ज्योतिरादित्य यांचे समर्थक आमदार त्यांच्यासोबत जाणार आहेत, असं सांगण्यात येतंय.
राज्यपालांनी ‘या’ मंत्र्यांना हटवले
मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिफारस केल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी सहा मंत्र्यांना पदावरून हटवले. इमरती देवी, तुलसी सिलावट, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युम्न सिंह सिसोदिया आणि प्रभुराम चौधरी यांना हटवण्यात आलंय. या सर्व मंत्र्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या समर्थनात बंड केले होते.
राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांना भेटणार
विधानसभा अध्यक्षांनी १३ आमदारांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या नोटीसला उत्तर देण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शिंदे समर्थक १९ बंडखोर आमदार भोपाळला पोहोचल्यावर आधी राज्यपालांना भेटतील आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन राजीनामाची मागणी करतील, असं सांगितलं जातय.

अधिक वाचा  राष्ट्रवादी या तिघांचीच प्रॉपर्टी? भुजबळांचा राज्यसभा आग्रह सुरू; राज्यसभेवर पुतण्या समीरला आमदार करायचं?