पुणे – शहरात करोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातच कचरा डेपो विरोधी संघर्ष समितीकडून कचरा डेपोवर येणारा कचरा बंद करण्यात आल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठक बोलविली होती. मात्र, ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या आंदोलनावर कोणताही तोडगा निघालेला नाही.

ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत कालबद्ध आश्‍वासन महापालिकेने लेखी दिल्यास, त्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करून आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका संघर्ष समितीने घेतली आहे. तर, महापालिका लेखी देण्यास तयार असून ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे.

अधिक वाचा  जनतेचे ‘एनडीए’ला बहुमत पंतप्रधानांच्या जिव्हारी! मला पाठबळ मिळालं पण ‘हे’ हटवा; नेते कार्यकर्त्यांना विनंती! 

गेल्या 17 दिवसांपासून ग्रामस्थांनी उरुळी देवाची येथील कचरा डेपोत महापालिकेच्या कचरा घेऊन येणाऱ्या गाडया बंद केल्या आहेत. त्यामुळे सुरुवातील काही दिवस महापालिकेकडून शहरातील कचरा शहरातच जिरविण्यास सुरुवात केली असली तरी, आता कचरा साठू लागला आहे तसेच करोनाची साथही वाढत आहे.

ग्रामस्थांनी महापालिकेस 10 एप्रिल महापालिकेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पालिका प्रशासन तसेच महापौरांकडून करण्यात आली. मात्र, संघर्ष समितीने त्यास नकार दिला. या पूर्वीही पालिकेने अशाच प्रकारे वेळेवेळी मुदत वाढवून मागितली, तसेच विकासकामे करणार असल्याचे तसेच ग्रामस्थांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

अधिक वाचा  ‘2022 ला बांबू लावले नसते तर इथे दिसलो नसतो’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

मात्र, प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, यावेळीही तशीच स्थिती असल्याचे संघर्ष समितीचे रणजीत रासकर, डॉ. बाळासाहेब हरपळे, संजय हरपळे, धनंजय कामठे, महापालिकेचे नगरसेवक गणेश ढोरे, किशोर पोकळे, विश्‍वास हरपळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळीही महापालिका अशाच प्रकारे वेळ वाढवून मागत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.