पुणे – परदेशी नागरिक अथवा परदेशातून प्रवास करून आलेले भारतीय नागरिक याबाबतची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी देण्यात यावी, विमानतळावरून प्रवाशांबद्दलची माहिती आरोग्य विभागास उपलब्ध होते. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील रुग्णांचा शोध घेऊन निरीक्षणाखाली ठेवावे, विपश्‍यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांना दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत करोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीयस्तरावरून व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात व इतरत्र प्रवास करीत आहेत. त्यामुळे करोना विषाणूचे संशयित रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. संशयित रुग्णामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व विभागांना सूचना देण्यात येत आहेत.

अधिक वाचा  ‘…म्हणून आम्ही मेल्याच नाटक केलं’, जम्मू दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या यात्रेकरुंचा अंगावर काटा आणणारा अनुभव

महापालिका प्रशासनाची जबाबदारी… रुग्णालयांच्या मार्फत जनजागृती करणे
वॉर्ड निहाय स्वच्छता ठेवणे
औषध विक्रेते यांनी रास्त दराने मास्क विक्री, औषधांची साठेबाजी , संसर्गाबाबत चुकीचे समज पसरविणे आदी बाबी निदर्शनास आल्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणी यांची अधिकारी यांना माहिती देण्यात यावी
मदत केंद्र व माहिती केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे. ही केंद्र 24 तास सुरू ठेवण्यात यावी

पोलीस प्रशासनाची जबाबदारी…
करोना संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही सायबर सेलमार्फत करण्यात यावी
अफवांवर नियंत्रण ठेवणे
गर्दीच्या ठिकणी आवश्‍यक ती जनजागृती करणे
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणारे आयोजक यांना सदर कार्यक्रम आयोजित करू नये, अथवा पुढे ढकलण्याबाबत अवगत करणे.

अधिक वाचा  तमन्ना, राशी खन्नाचा हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ लवकरच OTT वर

आरोग्य विभागाकडील जबाबदारी…
स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्णवेळ तैनात ठेवावी
खासगी डॉक्‍टरांची सेवा अधिग्रहीत करणे
खासगी हॉस्पिटलमधील साधनसामुग्री अधिग्रहीत करणे
संशयित रुग्णांची स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे