भोपाळः भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी भोपाळमधील भाजप कार्यालयातील सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजप कार्यालयात ज्योतिरादित्य शिंदे यांचे आज जोरदार स्वागत झाले. राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करणार नाही. पण तुम्हाला जे बाहेरून दिसतंय त्याहीपेक्षा अवघड आहे आत राहून सामना करणं, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
हे शिंदे घराण्याचं रक्त आहे. जे सत्य आहे तेच बोलतं. मंदसोरमध्ये शेतकऱ्यांवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रस्त्यावर उतरावं लागले, असं मी सांगितलं. मग उतरा रस्त्यावर असं मला सांगण्यात आलं. शिंदेंना आव्हान दिल्यावर शिंदे घराणं गप्प बसणाऱ्यातलं नाही, असं ज्योतिरादित्य म्हणाले.
काँग्रेसच्या आरोपांचं आणि टीकांचं स्वागत करतो. पण त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही. त्या पक्षाची तब्बल १८ वर्ष सेवा केली हेच, त्यांना चपखल उत्तर आहे, असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
ज्योतिरादित्य भावुक झाले
हा क्षण मला भावुक करणारा आहे. ज्या संघटनेसाठी आणि घराण्यासाठी मी २० वर्ष दिली, पक्षासाठी प्रचंड मेहनत घेतली, ते सर्व मागे सोडून आता मी मला तुमच्या स्वाधीन करतोय. भाजपने पक्षात स्थान दिले. यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहांचा आशीर्वाद मिळाला आहे, असं ज्योतिरादित्य म्हणाले.
ज्योतिरादित्य यांनी भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशातील माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे यावेळी कौतुक केले. जनतेशी नाळ जुळलेला आणि समर्पण भावनेतून काम करणारा नेता म्हणजे शिवराजसिंह चौहान. त्यांच्याबद्दल आताच का बोलतोय असं काहींना वाटत असेल. पण मी हे जाहीरपणे म्हटलं आणि संकोच करणाऱ्यातला मी नाही, असं ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितलं.

अधिक वाचा  बहिणींची अब्रु वाचण्याच्या शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, 100 टक्के….