मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये आम्ही जे ठरविले होते, त्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी फारकत घेतली. आपण दिलेला शब्दच पाळला नाही. त्यामुळे आमच्या चुकीचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाला, असा घरचा आहेर भाजपचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षीय नेत्यांना दिला.
राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेत मुनगंटीवार बोलत होते. राजकीय संदर्भ देताना ते म्हणाले, ‘शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरले होते तो शब्द आम्ही पाळला असता, तर आज शिवसेनेसोबत आमची सत्ता असती. आम्ही त्यांना फसवले, आमची चूक झाली. आमच्या चुकीचा फायदा तुम्हाला झाला. पण एक ना एक दिवस ती चूक आम्ही सुधारू.’
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जे ठरले तो शब्दच आमच्या पक्षाच्या नेत्यांकडून फिरविला गेला. त्यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत दिसत आहेत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची तीन महिन्यांची मैत्री असेल, तर आमची मैत्री ३० वर्षांपासूनची जुनी आहे, हे विसरू नका, असेही मुनगंटीवार म्हणाले.

अधिक वाचा  अजितदादांनी ताफा थांबवला गाडीतून उतरले, मदतीलाही धावले, नेमकं काय झालं?