उस्मानाबाद : जिल्ह्यतील शेतकऱ्यांच्या दृष्टिने महत्त्वाचा असलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पासाठी सर्वाधिक आर्थिक तरतूद मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. जिल्ह्यला झुकते माप देत या प्रकल्पासाठी जवळपास ८४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे पत्रक सेना आमदार कैलास पाटील यांनी काढले. त्यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी जोरदार टीका करीत बारकावे समजून घेण्यासाठी आव्हान दिले आहे. शिवसेनेचे आमदार कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाला ८४० कोटींची तरतूद केल्याचे सांगत स्वतची पाठ थोपटून घेत आहेत. मात्र त्यांनी मागील अर्थसंकल्पात यासाठी केलेल्या तरतुदींपकी किती रक्कम खर्च झाली, याचे बारकावे समजून घेतले असते तर त्यांनी हे पत्रक काढलेच नसते, अशी टीका काळे यांनी केली आहे.
कागदी घोडे नाचवण्यापेक्षा बारकावे समजून घेत त्यावर उपाययोजना करा असा सल्ला देत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आमदार पाटील यांच्यासमोर काही प्रश्न उभे केले आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी कागदी घोडे नाचवून श्रेय घेत जनतेची दिशाभूल करण्याऐवजी या प्रकल्पाचे बारकावे समजून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपली राजकीय ताकद वापरली तर ते अधिक सयुक्तिक राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. जलसंपदा विभागाने या प्रकल्पाच्या कामांना प्राधान्यक्रम देवून विशिष्ट मर्यादा टाकल्यामुळे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे.
सद्य:स्थितीला शासनाने आखून दिलेल्या प्रकल्पाच्या कामांच्या प्राधान्य क्रमामध्ये सर्वप्रथम लिंक-५, उद्धट बॅरेज, जेऊर बोगदा व उपसा टप्पा क्रं. १ ची कामे पूर्ण करावीत, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उपसा सिंचन योजना क्रमांक १ अंतर्गत सोनगिरी साठवण तलावापर्यंतची उपसा घटकांची सर्व कामे व उपसा सिंचन योजना क्रमांक २ ची कामे तसेच पांगरदरवाडी साठवण तलाव ते रामदरा साठवण तलाव ही कामे निधी असला तरी हाती घेता येऊ शकत नसल्याचे काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
या प्रकल्पाच्या कामांना प्राधान्यक्रम देवून विशिष्ट मर्यादा टाकल्यामुळे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच खर्च करण्यास देखील मर्यादा पडत आहेत. परिणामी गेल्यावर्षी अर्थसंकल्पात जी तरतूद करण्यात आली होती, ती देखील खर्च होऊ शकली नाही. या मर्यादेमुळे निधी उपलब्ध असलेल्या २४ किलोमीटर लांबीच्या जेऊर बोगद्याचे काम तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने केवळ ५ किलोमीटर इतके पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाला अर्थसंकल्पात हजार कोटींची जरी तरतूद झाली तरी कामांना प्राधान्यक्रम देवून विशिष्ट मर्यादा टाकल्यामुळे कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. नवीन तरतूद किती झाली हे सांगत बसण्यापेक्षा कामाची गती वाढविण्यासाठी काय केले? असा सवालही यानिमित्ताने काळे यांनी उपस्थित केला आहे. औरंगाबाद येथील मराठवाड्याच्या जिल्हानिहाय आढावा बठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आपण स्वत या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
प्रकल्प सुरूोाल्यापासून २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच ८४० कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. निधी मिळाल्याने आम्ही केलेल्या मागणीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला होता.
जिल्ह्यसाठी महत्त्वाचा प्रकल्प
उस्मानाबाद जिल्ह्यसाठी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाची किंमत रुपये ४८४५.०५ कोटी असून यातील पहिल्या टप्प्यातील ७ टीएमसी पाणी वापरासाठी व २३४९.१० कोटी रुपयांचे काम २००९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेने सध्या चालू आहे. जिल्ह्यतील पहिल्या टप्प्यात २६ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

अधिक वाचा  कोल्हापूर हादरलं सोशल मीडिया वाद, तरुणावर वार;  3 दुचाकीवरून आलेल्या 8 ते 10जणांचा जीवघेणा हल्ला