काबुल : अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातील दोन तळांवरील आपले सैन्य माघारी घेण्यास सुरवात केली आहे, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
अमेरिका आणि तालिबानमधील करारानुसार आजच्या दिवसापासून अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेण्यास सुरुवात करायची, असे ठरले होते. अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार अथवा राजकीय संकट असले तरी या अटीचे पालन करण्यास आपण बांधील असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील विदेशी फौजा 14 महिन्यात पूर्ण काढून घेतल्या जातील, असे अमेरिकेने दोहा करारामध्ये मान्य केले आहे. मात्र त्यासाठी तालिबानकडून सुरक्षेसंदर्भातील अटींच्या पूर्तता करायला हवी, असेही ठरले आहे.
या करारानुसार, जुलैच्या मध्यापर्यंत अमेरिकेने आपले सैन्य 12,000 वरून 8,6000 पर्यंत कमी केले पाहिजे. अफगाणिस्तानमधील 20 तळांपैकी 5 तळांवरील सैन्याची कुमक कमी केली जाणे अपेक्षित आहे.

अधिक वाचा  लक्ष्मण हाकेंवर दारु पिल्याचा आरोप, मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया काय?