नवी दिल्ली : माजी केंद्रीयमंत्री आणि मध्य प्रदेशातले काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे आज संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपला राजीनामा पाठवलाय. वेळ महत्वाचा आहे. २-३ दिवसात राज्यसभेच्या जागा निश्चित करायच्या आहेत. १३ तारीख अंतिम आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांच पुनर्वसन करणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
मध्य प्रदेश सरकार स्थापन झालं. मध्य प्रदेशमधून राज्यसभेत जाऊन संसदेवर पाठवता आलं असतं. कमलनाथ मुख्यमंत्री झाले. पक्षाध्यक्ष पद पण त्यांच्याकडेच राहीलंय. ते पद ज्योतिरादित्य सिंधिया यांना देता आलं असतं. तशी सिंधिया यांची मागणी देखील होती. वन मॅन वन पोस्टप्रमाणे पक्षाध्यक्ष पद ज्योतिरादित्य यांना देता आलं असतं. पण तसं न झाल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर स्फोट झाल्याचे चव्हाण म्हणाले.
ज्योतिरादित्य सिंधिया हे अत्यंत उदयोन्मुख नेतृत्व होतं. तरुण नेतृत्व होतं. हिंदी भाषेवर प्रभुत्व होतं. राज्याचा नसला तरी मंत्रीपदाचा दिल्लीमध्ये अनुभव होता. ते निश्चितच भावी नेते होऊ शकले असते. भाजपमध्ये जाऊन थेट प्रवेश करतील का ? हा प्रश्न आहे. किंवा प्रादेशिक पक्ष निर्माण करुन सर्व आमदार त्यात जातील. आणि ते मिळून राज्यसभेत भाजपसोबत जातील अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्त होईल.

अधिक वाचा  ‘रामायणा’चा अपमान करणं आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्यांना महाग पडलं, चुकवावी लागली मोठी किंमत