नागपूर : ‘करोना व्हायरस’चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची विमानतळावर ‘थर्मल स्क्रिनिंग’ केली जात आहे. त्यांचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे फार्म भरून घेतले जात आहेत. दिल्ली विमानतळावर फार्मचा तुटवडा असल्याने प्रवाशांना दीड ते दोन तास ‘इमिग्रेशन काऊंटर’वर रांगेत उभे रहावे लागत आहे. यामुळे अनेकांच्या ‘कनेक्टिंग फ्लाईट्स’ सुटल्याचे कळते.
करोनाच्या भीतीमुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडून पत्ता आणि आजाराची लक्षणे याबाबत एक फार्म भरून माहिती गोळा केली जात आहे. परंतु तो भरण्याची प्रवाशांना कल्पना नसल्याने गोंधळ उडतो. मात्र विमानतळावर त्यामुळे भारतीय नागरिकांचा गोंधळ होत आहे. प्रारंभी काही ठराविक देशांमधून आलेल्या प्रवाशांकडूनच असा फॉर्म भरून घेतला जात असे.
यासंदर्भात काठमांडूवरून दिल्लीत आलेले पुण्याचे शिरीश पाठक म्हणाले, दिल्ली विमानतळावर ‘थर्मल’ तपासणीसाठी दोन फार्म भरावे लागतात. एका फार्मच्या दोन प्रती भराव्या लागत आहेत. पण एअरलाईन्सकडून एकच फार्म दिला जातो. हे दोन फार्म आरोग्य विभाग आणि इमिग्रेशन केंद्रासाठी हवी असते. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा फार्म आणून रांगेत लागावे लागते. त्यानंतर ‘इमिग्रेशन काऊंटर’समोर मोठी रांग लागली होती. तेथे एक तास गेला. तेथे १२ काऊंटर होते, पण चार-पाचच अधिकारी होते. रांगेत लागणाऱ्यांची एवढी गर्दी होती की, येथे करोना विषाणूची बाधा होण्याची भीती होती. याबाबाबत इमिग्रेशन विभाग हतबल दिसून आला. रविवारी गर्दी आणि विलंबामुळे प्रवाशी संतापले आणि घोषणा देऊ लागले.
विमानतळावर परदेशी नागरिकांना वेगळे आणि भारतीयांना वेगळे काऊंटर देण्यात आले आहे. मात्र, फार्मबद्दल आगाऊ सूचना न देणे आणि ते पुरेसे उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा वेळ जात आहे. शिवाय इमिग्रेशन केंद्रात परदेशी आणि भारतीय नागरिकांना देखील फार्म जमा करावा लागत आहे. यामुळे विमानतळावर गोंधळाची स्थिती आहे, असेही पाठक म्हणाले. दरम्यान, विमान वाहतूक कंपन्यांनी भारतात येणाऱ्या प्रवाशांनी या फार्मचे प्रिन्ट काढावे, ते भरून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी. कारण, फार्मचा तुटवडा आहे, असे म्हटले आहे.
आगाऊ उपाययोजना म्हणून परदेशातून येणाऱ्यांकडून फार्म भरवून घेतला जात आहे. फार्मचा तुटवडा नाही. तो ऑनलाईन उपलब्ध आहे. प्रत्येकाला फार्म भरायला दोन-तीन मिनिटे लागतात. त्यामुळे साहजिकच गर्दी होते. कनेक्टींग फ्लाईट सुटल्यास प्रवाशाला दुसऱ्या विमानात समावून घेतल्या जात आहे.
– प्रवीण भटनागर, जनसंपर्क अधिकारी, एअर इंडिया

अधिक वाचा  मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठक; मविआचा मात्र बहिष्कार ओबीसी नेत्यांची ही मोठी मागणी, मुख्यमंत्री काय निर्णय?