पुणे : बलिदान भुमी श्री क्षेत्र तुळापुर येथे स्वराज्यध्वजाची बैठक संपन्न झाली. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समिती आयोजित बैठकीसाठी सातारा जिल्हामधुन सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विलासराव मोहीते, सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे वंशज अक्षयराव मोहीते, सरदार जगदाळे , वाघ यांच्या घराण्यातील वंशज हजर होते. त्या सोबत राजे भोसले , शिर्के , शिंदे , पंलाडे इनामदार , श्रीमंत शितोळे देशमुख , गव्हाणे , भाडाळे , कामठे , खुटवड , मोरे , गायकवाड ( वाळके ) आदी घराण्यातील वंशज उपस्थित होते.

22 ते 24 मार्च दरम्यान छत्रपती संभाजी महाराज जन्मभूमी किल्ले पुरंदर ते बलिदान भूमी शिवक्षेत्र तुळापूर असा प्रवास असणाऱ्या पालखी सोहळ्याचे हे 6 वे वर्ष आहे. संभाजी महाराज यांचा खरा इतिहास घराघरात जाऊन प्रत्येकाच्या मनात शंभू चरित्र समजावे यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालखी सोहळ्याचा आढावा घेऊन सोहळ्यास येणा-या शंभुभक्तांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याची तयारी करण्यात आली.

अधिक वाचा  EVM घोळाबाबत याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या खांद्याला खांदा देऊन लढणारे स्वराज्याचे खरे शिलेदार मावळे होते. तत्कालीन मावळ्यांचे वंशज स्वतःच्या ध्वजासह मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या वर्षी 35 ध्वज पालखी सोहळ्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात सरदार घराण्यातील वंशजाना आपला ध्वज 15 मार्च पर्यंत समाविष्ट करता येणार आहे. आपणास आपल्या घराण्याचा अथवा आपल्या गावाचा ध्वज पालखी सोहळ्यात समाविष्ट करावयाचा असल्यास विपुल शितोळे – 9730582597 आणि भाऊसाहेब शिंदे- 90280 97797 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पालखी सोहळा समिती अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केले आहे. यावेळी पालखी सोहळा विश्वस्त शिवले, शामराव खुटवड, महेशराव टेळे, तात्यासाहेब भाडाळे, शरदराव ओव्हाळ,शिल्पा तुपे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  समान नागरी कायद्याचा संविधानाला नव्हे, आरएसएसला धोका; प्रकाश आंबेडकर

*असे आहे पालखी सोहळ्याचे वेळापत्रक*

22 मार्च स. 7.00 वाजता किल्ले पुरंदर
22 मार्च स. 10.00 वा. नारायणपुर
22 मार्च दु. 1.00 वा. सासवड विसावा.
22 मार्च सा. 7.00 वा वडकी मुक्काम
23 मार्च स. 7.00 वडकी प्रस्थान
23 मार्च दु . 1.00 वा. मांजरी विसावा
23 मार्च सायं. 7.00 वा. वाघोली मुक्काम
24 मार्च स. 7.00 वा वाघोली प्रस्थान
24 मार्च दु. 12 .00 वा. तुळापुर आरती
24 मार्च दु. 2.00 वा. वढु