मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पी भाषणात त्यांनी विरोधी पक्षांना जोरदार टोला लगावला. पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विरोधी पक्षांना जोरदार टोला लगावला. पण या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी एक चूक केली.
पवार यांनी ‘असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो’ असं म्हणत भाजपला चिमटा काढला. निवडणुकीतील पराजय स्वीकारा आणि काय कमतरता राहिली याचा विचार करा, असा सल्ला पवार यांनी भाषणातून दिला. पवार यांनी ‘असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो’, अशा कवितेच्या दोन ओळी सादर केल्या. यानंतर पवार यांनी सांगतिलं की ही कविता हरिवंशराय बच्चन यांची आहे.
अजित पवार यांच्या भाषणानंतर बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत अजित पवार यांच्या भाषणातील चूक लक्षात आणून दिली. ‘असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गयी देखो और सुधार करो’ या कवितेच्या ओळी हरिवंशराय बच्चन यांनी नाही तर कवी सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिली आहे. असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार सत्तेत आले आहे. ही महाआघाडी बनण्यापूर्वी अजित पवार यांनी बंड करून भाजपला समर्थन होते. त्यांनी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हे सरकार फारकाळ टिकले नाही. फडणवीस आणि पवार यांनी राजीनामे दिले आणि महाआघाडी सरकारचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता.