मुंबई : देशभरात करोना रुग्णांची वाढती संख्या आणि येस बँकेवर लादलेले निर्बंध याचा प्रचंड धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी शुक्रवारी सकाळी बाजारात जोरदार विक्री केली. या नकारात्मक घटनांनी बाजार कोसळणार असा अंदाज विश्लेषकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार बाजार उघडताच सेन्सेक्स एका मिनिटांत १४०० अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३५० अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे एका झटक्यात चार लाख कोटींचे नुकसान
झाले. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर आर्थिक निर्बंध घातले असून खातेदारांना आता ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. ५० हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. खातेदारांना फक्त वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. पण त्यासाठी रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने घोळामुळे पीएमसी बँकेवरही निर्बंध घालण्यात आले होते. यामुळे खातेदारांचे मोठे हाल झाले होते.
येस बँकेची पत ढासळल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. या कारवाईत रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे.

अधिक वाचा  विश्र्वशांती विद्यापीठ डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार