सातारा : कोरोना व्हायरस प्रभावित इराण देशामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर येथील 44 नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी एक पत्र लिहित विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील काही पर्यटक इराक देशातील करबला शहराला भेट देण्यासाठी इराण मार्गे विमानाने निघाले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्व विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. यासंदर्भात माहिती मिळताच परराष्ट्र मंत्रालयाशी तात्काळ संपर्क साधला. भारत सरकार कडून कोरोना तपासणीसाठी लॅबोरेटरी सुरू केली जाणार आहे.
कोरोना तपासणीसाठीच्या लॅबोरेटरीमध्ये भारतीयांची तपासणी करून कोरोना बाधितांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात तिथेच ठेवले जाईल. तर ज्यांना व्हायरसची बाधा झालेली नाही त्यांना विशेष विमानाने मायदेशी पुन्हा आणण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाडून माहिती देण्यात आली असल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना भारतात परतण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे, असंही पाटील म्हणाले.

अधिक वाचा  फडणवीसांच्या ‘व्हिक्टीम कार्ड’ नंतर ‘टीम देवेंद्र’ सक्रीय पुन्हा’देवेंद्र पर्व’?; पराभवाचा शोध की स्व-बळ चाचपणी?