हैदराबाद : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे संकट येण्याच्या काही महिने आधीच आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर ट्रस्टने येस बँकेतून तब्बल 1 हजार 300 कोटींची रक्कम काढली होती.
वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर लगेच येस बँकेतून मंदिर प्रशासनाचे 1 हजार 300 कोटी रुपये काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या ट्रस्ट चार प्रायव्हेट बँकांमध्ये फंड जमा केलेला आहे, ज्यामध्ये येस बँकेचाही समावेश होता.

अधिक वाचा  लक्ष्मण हाकेंची तब्येत बिघडली; डॉक्टरांकडून तपासणी, उपचारास नकार