नवी दिल्ली – कोहलीनंतर सर्वात चांगला तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्‍य रहाणे आहे हे मान्य करतो, पण तो गेल्या काही महिन्यांपासून खूपच संथ खेळ करतो. बाद होण्याची भीती त्याच्या फलंदाजीत दिसून येते. संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी असतेच पण म्हणून केवळ संथ खेळून उपयोग नाही तर त्याने दावाही केल्या पाहिजेत. त्याला बाद न होता खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे आहे; परंतु मग धावा कधी करणार असा प्रश्‍न पडतो, अशा शब्दांत निवड समितीचे माजी अध्यक्ष व माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी रहाणेवर ताशेरे ओढले आहेत.

अधिक वाचा  राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? “सातारा सोडतो पण त्या बदल्यात…”

तसेच, ऋषभ पंत याला वारंवार संधी देऊनही त्याच्या कामगिरीतील अपयश संपण्याचे नावच घेत नाही, त्यामुळे येत्या मालिकांमध्ये त्याला खेळविण्याचा हट्ट सोडा व अव्वल यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला खेळवा, असे मत भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष व माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.