नवी दिल्ली – येस बॅंकेच्या निमीत्ताने देशातील आणखी एक बॅंक आर्थिक अडचणीत आली आहे, त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या देश विषयक कल्पनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा सत्यानाश झाला आहे असे त्यांनी आपल्या एका ट्‌विटर संदेशात म्हटले आहे.
नो एस बॅंक अशा वाक्‍याने त्यांनी या प्रकरणाचा उल्लेख करीत मोदींवर निशाणा साधला आहे. कालच येस बॅंक आर्थिक अडचणीत आल्यामुळे या बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. या बॅंकेचे शेअर्सही गडगडले असून देशातील एकूणच बॅंकिंग क्षेत्रातील शेअर्स मध्येही घसरण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदींवर हा निशाणा साधला आहे. त्यावर भाजपची मात्र अजून प्रतिक्रीया आलेली नाही.

अधिक वाचा  शिवजयंती निमित्त मांजरी फार्म ला विविध कार्यक्रमांचे आयोजन ; शिवराज्य प्रतिष्ठानचा पुढाकार