मुंबई: रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं तिचं आयुष्य बदललं. पण हे चांगले दिवस कायमचे राहिले नाहीत. आता काही दिवसांतच रानूवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली आहे. ती सध्या तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती. तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तिला बॉलिवडू चित्रपटात गाणं गायची संधी देखील मिळाली. पण वाट्याला आलेलं हे स्टारडम रानूला टिकवता आलं नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत असे परंतू तिला हे सर्व हाताळता आलं नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे.
कोण आहे रानू मंडल ?
रानू मंडल पश्चिम बंगाल येथे राहते. दररोज ती स्टेशनवर गाणं गाऊन गुजराण करत होती. लता दीदींचं अवघड गाणं सहजतेनं गाणाऱ्या रानूला पाहून एकानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि राणू अचानक सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली.
रानू मंडलवर बायोपिक
रानू मंडलच्या आयुष्याचा पट मोठ्या पडद्यावरदेखील झळकणार आहे. ‘प्लॅटफॉर्म सिंगर रानू मंडल’ असं या बायोपिकचं नाव असणार आहे.दिग्दर्शक ऋषिकेश मंडल या बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. पश्चिम बंगालच्या प्लॅटफॉर्मपासून ते बॉलिवूडमध्ये गाणं गाण्यापर्यंतचा रानू मंडलचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटला, ‘या’ दिवशी जाहीर होणार पहिली यादी